किन्ही-मोखे येथे बिबट्याचा धुमाकूळ; दिपलाल क्षीरसागर यांचा बकरा ठार

दै. लोकजन वृत्तसेवा
किन्ही (मोखे):- साकोली तालुक्यातील किन्ही मोखे परिसरातील किन्ही मोखे विश्री पाथरी तुडमापुरी वडेगाव शंकरपुर खांबा जांभळी भिवसनटोला मालुटोला रेंगेपार सातलवाडा या गावांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सतत सुरू असून कुठे ना कुठे वन्यप्राण्यांमुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत. कधी शेतपिकांची नुकसान तर कधी शेतकरी पशुपालकांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर रात्री बे रात्री हल्ल्याच्या घटनांत वाढ होत आहे. किन्ही-मोखे येथे पाच सप्टेंबर चे रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून दिपलाल बारकु क्षीरसागर यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्याचा फडशा पाडल्याची (ठार केल्याची) घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळी बिबट्याने बकऱ्या्र अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बकरा गंभीर जखमी होऊन ठार झाला. सकाळी दिपलाल क्षीरसागर गोठ्यात गेल्यावर ही घटना लक्षात आल्यानंतर क्षीरसागर कुटुंबांयांनी याबाबत माहिती दिली.

या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, तसेच बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिक व पशुधनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *