श्री गोपाल बुरडे ग्रामपंचायत अधिकारी यांना गुरुकुंज आश्रम तर्फे ‘ग्रामगीताचार्य’ पदवी बहाल

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा:- अखिल भारतीय गुरुदेव सेवा आश्रम गुरुकुंज तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील जीवन विकास परीक्षा केंद्र वतीने दरवर्षी ‘ग्रामगीताचार्य’ ही परीक्षा घेण्यात येत असते. या परीक्षेसाठी प्रवीण, ग्रामनाथ आणि ग्रामगीतग्त्र अशा पास करणे आवश्यक असते. त्यानंतर ही परीक्षा घेण्यात येत. या परीक्षेत एकूण ६०० गुणांची असते. त्यात लेखीपेपर, प्रकल्प, प्रबंध, पाठांतर, व्याख्यान आणि प्रश्नावली असे प्रत्येकी १०० प्रमाणे मार्क असतात. यात सन २०२६ या मध्ये गोपाल सुभाष बुरडे यांनी ‘ग्रामस्वच्छता अभियान’ या विषयांवर प्रबंध सादर केले होते. त्यात ते या विषयामध्ये प्रथम आले आहेत. तर परीक्षेत ७२ टक्के गुण घेऊन ५ व्या क्रमांकात उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल त्यांना वार्षिक पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमात दिनांक २९ ऑक्टोबरला पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

गोपाल सुभाष बुरडे यांच्या कडे अखिल भारतीय गुरुदेव सेवा आश्रम गुरुकुंज येथील भंडारा शहर प्रमुख तसेच परीक्षा विभागा चे पद असून ते भंडारात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रचारक म्हणून कार्य करीत असतात. ग्रामगीता ग्रंथ महत्व, भजन स्पर्धा, साहित्य प्रचार, शालेय विद्यार्थी यांची परीक्षा घेणे इत्यादी कार्य जिल्ह्यात करीत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *