१३ वर्षीय सूर्यांशू बारसेने १ तास ३५ मिनिटांत पार केले वैनगंगा नदीचे अंतर
भंडाराच्या जलतरणपटूची चमकदार कामगिरी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी असामान्य जिद्द आणि चिकाटीच्या জোरावर महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी सूर्यांशू सुभाष बारसे याने वैनगंगा नदीत जलतरणाचा थरारक पराक्रम केला आहे. कारधा ते कोरंबी हे वैनगंगा नदीतील अंतर त्याने अवघ्या १ तास ३५ मिनिटांत पोहून पार करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भंडारा जिल्ह्यातील हा विक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. एवढ्या कमी वयात नदीच्या प्रवाहात एवढे मोठे अंतर पार करणे हे मोठे आव्हान असते, मात्र सूर्यांशूने ते लीलया पेलले. त्याच्या या यशामागे कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन आहे. त्याला प्रशिक्षक अविनाश निंबार्ते आणि करण शेंडे यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने जलतरणाचे तंत्र आत्मसात केले आहे.
दरम्यान, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने सन २०२६-२७ ची जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धा दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. वयोगट १४, १७ व १९ मुले व मुली या गटात झालेल्या या स्पर्धेतही सूर्यांशूने सहभाग घेतला होता. त्याच्या या कामगिरीबद्दल क्रीडा वर्तुळातून आणि शाळेकडून त्याचे कौतुक होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत








