पवनी चा बॅकलॉग भरण्याकरिता आम्ही कटीबद्ध
दै. लोकजन वृत्तसेवा
पवनी :- पवनी नगर परिषदेचा बॅकलॉग बाकी आहे आणि तो भरून काढण्यासाठी येथील ३७२ विविध धर्म्याच्या मंदिरांचे विकासाकरिता ५०० कोटींचा निधी मंजूर करून आणण्याकरिता मी कटीबद्ध आहे. तो बॅकलॉग भरण्याकरिता मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द पवनीच्या नागरिकांना आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. ते शनिवारी पवनी येथील सक्सेना प्राथमिक शाळेच्या पेटांगणात आयोजित दही हंडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गोकुळ मित्र मंडळ पवनी आणि आ. नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत. या वेळी विशेष अतिथी म्हणून आचार्य रुपानंद महाराज मंचावर उपस्थित होते.
आम. भोंडेकर आपल्या भाषणात म्हणाले कि, त्यांनी भंडारा पवनी विधान सभेचा आमदार म्हणून आपले कर्तव्य निभावण्याचे पूर्ण प्रयत्न केले. अश्यात जेव्हा पवनी नगर परिषदेत अंतर्गत जल पर्यटन, सि व्हिरेज, तलाव सौन्दर्यकरण सह रस्ते निर्माण करिता निधी आणला तर लोक प्रश्न करायचे कि इतक्या लहानश्या नगर परिषदेला हि कामे होऊ शकणार का? पण हे सर्व करणाऱ्यावर निर्भर करते. कारण हे सर्व प्रोजेक्ट आणले आहे आणि त्याची कामे सुद्धा पूर्ण होतील. इतकेच नाही तर आता नवीन कामे सुद्धा आणू. त्यांनी हमी दिली की, आता लोकांना अशी नवी पवनी पाहायला मिळेल की ते म्हणती हि खरच विदर्भाची काशी आहे आणि सुंदर आहे.
आम. भोंडेकर म्हणाले की, कुणी कितीही नकारात्मक असेल तरीही ते स्वतः सकारात्मक आहे. या वेळी मंचावर उपस्थित पवनी नगर परिषदेच्या अध्यक्षा डॉ. विजया नांदुरकर यांना आम. भोंडेकर यांनी हमी दिली की, तुम्ही कामे करा ते यांच्या अध्यक्षतेत, गोंदिया भंडारा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उप जिल्हा प्रमुख सुरेश धूर्वे, जिल्हा संघटक बंडू हटवार, उप जिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उप जिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, शिवसेना तालुका प्रमुख जितेश इखार, तालुका प्रमुख बाळू फुलबांधे, शहर प्रमुख अनिल धकाते, युवा सेना प्रमुख भोजराज वैद्य, आणि युवासेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोसे ग्रामपंचायतीचे सरपंच आशिषकुमार माटे, पवनी न.प. चे गटनेता नामदेव सूरकर, माजी न.प. उपाध्यक्ष नरेश बावनकर, युवा सेना प्रमुख भोजराज वैद्य, प्रशांत भुते, उपशहर प्रमुख श्रीकांत भोगे, नगर सेवक देवराज बावनकर, नगर सेविका नगर सेविका वैष्णवी हटवार, नगर सेविका ज्योती तेलामासरे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








