भंडारा येथे गोर बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- गोर बंजारा समाजाच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत संस्कृती व परंपरांचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने तिज महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा तांडा येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. गोर बंजारा समाजमध्ये तिज महोत्सवाला विशेष सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व असून, या उत्सावाच्या माध्यमातून समाजातील महिला, भगिनी तसेच युवक-युवती मोठ्या उत्साहात सहभागी होत पारंपरिक संस्कृतीचा आनंद घेतात.
या कार्यक्रमाला शंकर राठोड, माजी गटशिक्षणाधिकारी, माणिक चव्हाण, उपकार्यकारी अधिकारी, नंदकिशोर जाधव, शालिक राठोड, मनोज चव्हाण डीएफ, रामदास राठोड पोलीस उपनिरीक्षक, संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, सचिन राठोड, मा. अनिल पवार तहसीलदार, कोमलसिंग राठोड, दारासिंग चव्हाण, दिलीपद राठोड, हितेश चव्हाण, प्रविण राठोड, दिनकर राठोड, विवेक चव्हाण, उदयसिंग आडे, यशपाल राठोड, पंकज जाधव, विजय चव्हाण, दिगंबर राठोड, सुभाष राठोड, सुरेश जाधव, राम चव्हाण, मुन्ना राठोड, गणेश चव्हाण, विनोद राठोड, प्रदीप पवार, हरी पवार, गोपाल राठोड, अविनाश राठोड, बाळा चव्हाण, बाबुराव पवार, किरण चव्हाण, रवि उगलमुले, माणिक आडे, नयन राठोड, जगदीश साबळे, अनिल पवार, सतीश राठोड, खुशाल राठोड, अविनाश राठोड, तसेच यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भंडारा तांड्याचे नायक विजय जाधव तसेच कारभारी गजानन राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजबांधवांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी भंडारा तांड्यातील गोरबंजारा समाजातील सर्व बांधव व भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक परंपरा, तिज उत्सवातील विविध प्रथा आणि सामूहिक सहभागामुळे संपूर्ण तांड्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
तिज महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील महिला व भगिनींनी मोठ्या उत्साhane सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने तिज उत्सव साजरा करताना समाजातील एकता, बंधुभाव आणि आपुलकीचे दर्शन घडले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोरबंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक काळातही आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तिज महोत्सवामुळे समाजातील सर्व घटक एकत्र आले असून, सामाजिक एकता, सांस्कृतिक जाणीव आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. गोरबंजारा बांधव-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला चैतन्य प्राप्त झाले. आनंद, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीच्या वातावरणात तिज महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भंडारा तांड्याचे नायक मा. श्री. विजय जाधव, कारभारी मा. श्री. गजानन राठोड आणि समस्त समाजबांधवांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या तिज महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षीही हा सांस्कृतिक वारसा अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.








