राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, केंद्रातील नेत्यांसोबत समन्वयाचा अभाव; सुप्रिया सुळेचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला
दै. लोकजन सेवा
बीड:- मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना टोला लगावल्यानंतर त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नका, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यावर राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, कदाचित केंद्रातील काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचे समन्वय नसावे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लावला.
केंद्रातील काँग्रेस नेत्यांसोबत आमचा सातत्याने संवाद असतो, मात्र राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. महाराष्ट्र आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या संवादात गॅप असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संघटनात्मकदृष्ट्या सुप्रीम कोर्टात अद्याप लढाही लढत आहे. इलेक्शन कमिशनमध्ये भलेही अजित पवार गट जिंकला असेल, परंतु सर्वोच्च न्यायालयात आमची ही नैतिकतेची लढाई सुरूच राहील, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पक्षाचे संविधान आणि मालकी शरद पवारांकडेच असून पक्ष काढून दुसऱ्यांदा देणे हा पवारांवर झालेला मोठा अन्याय असल्याच त्यांनी सांगितले,








