जलसंधारणाचा संदेश देत ‘वॉक फॉर वॉटर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जलसंधारण दिनानिमित्त माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आयोजित ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉनाला भंडारा वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दसरा मैदानापासून सुरू झालेल्या ३ किलोमीटरच्या या महावॉकथॉमध्ये जनप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जलसंधारणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कोरे कारेमोरे, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जयश्री बोरकर, जिल्हा अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी महेश सेलूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठबकर यांनी केले.
‘माती वाचवा – पाणी वाचवा – सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशांनी परिसर दुमदुमला. सुरवातीला जलसंरक्षणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर महावॉकथॉ. ला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी देण्यात आली. यावेळी सर्व वयोगटातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे दिसले.
मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमातून जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याचा आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.








