कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केले मंत्रमुग्ध

वर्धा : बजाज कृषी महाविद्यालय पिपरी येथील फायनल वर्षाच्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण भागात पाठविण्यात आले. असाच पाच विद्यार्थ्यांचा समूह देवळी तालुक्यातील अलोडा येथे पाठविण्यात आले. या पाच विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानातून शेतकऱ्यांना मंत्रमुग्ध केल्याची प्रचिती दिसत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न बजाज कृषी महाविद्यालय पिपरी, वर्धा येथील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक प्रशिक्षणअंतर्गत देवळी तालुक्यातील अलोडा येथे चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या कुटारावर युरियाची प्रक्रिया करून त्याची पोषक गुणवत्ता व चव कशी वाढवता येईल याबद्दल माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिकतेवर व यांत्रिक शेतीवर कसे भर द्यावे, हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचे शेती विषयक ज्ञान ऐकून शेतकरी मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सोबतच शेतकऱ्यांनी आपल्या शंकासुद्धा दूर केल्या. हा कार्यक्रम बजाज कृषी महाविद्यालय पिपरी येथील प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के, उपप्राचार्य देशमुख, कार्यक्रमाधिकारी रवींद्र खर्चे, डॉ. रवीराज उदासी, डॉ. मंगेश घोडे, डॉ. प्रियंका हिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. हे प्रात्यक्षिक विद्यार्थी गज्जू राणे, लखन मिश्रा, आदित्य ढोमणे, अनुराग रामटेके व या भार्गव थोटे या विद्यार्थ्यांमार्फत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेला शेती विषयक ज्ञान पाहता शेतकरी सतत विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांच्याकडून माहिती घेत असल्याचे दिसत आहे.