भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई
६ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी विरोधात पोलीस अधीक्षकांच्या विशेष मोहिमेअंतर्गत भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी धाड टाकून अवैध हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत एकूण ६ लाख ३३ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिली कारवाई पोलीस स्टेशन मोहाडी अंतर्गत फरार आरोपी नामे विक्की गणराज भुरे, वय अंदाजे २४ वर्ष, रा. ढोरेवाडा, ता. तुमसर, जि. भंडारा याच्याविरुद्ध करण्यात आली. फिर्यादी पो.हवा. राऊत यांना गुप्त माहिती मिळाली होती की मौजा ढोरेवाडा येथे वैनगंगा नदी काठावर अवैध हातभट्टी सुरू आहे. माहितीवरून रेड केली असता आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला. तो उभा असलेल्या ठिकाणी पंचामक्ष पाहणी केली असता दहा प्लास्टिक झिल्लीत प्रत्येकी २५ किलो, एकूण २५० किलो सडवा मोहापास, एक लोखंडी ड्रम, तीन लहान टिनाचे पिपे असा एकूण ५१ हजार०७५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
दुसरी कारवाई मौजा परसवाडा येथे करण्यात आली. या कारवाईतील आरोपी रोहीत रंगलाल डोंगरे, वय २८, रा. आंबेडकर वार्ड देहाडी व फरार आरोपी रायसिंग दशरथ नागपुरे, वय ३८, रा. टिळक वार्ड देहाडीयांच्या ताब्यातून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी पो.हवा. राऊत यांनी गुप्त माहितीवरून रेड केली असता त्या ठिकाणी तीन लोखंडी गॅस पेट्या शेगडी, सात लोखंडी ड्रम, चार जर्मन घमिले, गॅस शेगडी एचपी कंपनीचे ३ सिलेंडर, ५) १५ प्लास्टिक निळे ड्रम २०० लिटरचे, सडवा मोहापास २२५० किलो, २५ लिटर हातभट्टी दारू ४०० रु. लिटर, एक मोपेड हिरो कंपनीची क्रं. एमएच ३६ ए के ६१८५ किं. ७० हजार रुपये असा एकूण ५ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी अप.क्रं. ३८५/२६ कलम ६५(ब)(क)(ड)(ई)(फ) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








