शिक्षणातून माणूस घडवा- आ. नाना पटोले

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- “विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिक्षणासोबतच माणूस सुद्धा घडवायचे आहे विद्यार्थ्यांनी बौद्धिक विकासा सोबतच माणूसकीचे धडे सुद्धा गिरवण्याचे आवाहन साकोली येथील गुणवंत विद्यार्थी त्यांच्या सत्कार समारोह सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा साकोली चे आमदार नानाभाऊ पटोले यांनी केले. आयोजित कार्यक्रमात एकुण ४१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्वांना मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर गोंदिया भंडारा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष युसूफ भाई, जि. प. समाज कल्याण सभापती मदन रामटेके, पं. स. सभापती गणेश आदे, जि. प. सदस्य शितल राऊत, सविता ब्राह्मणकर, अश्विन नशिने, कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष मार्कंडराव भेंडारकर व अन्य मान्यवर हजर होते.

आपल्या भाषणात आ. नाना पटोले यांनी सांगितले की, भविष्यासाठी शैक्षणिक कार्यात काही अडचण आल्यास मला हाक मी महाराष्ट्रात कुठेही असलो तरी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहे. आज जिल्हा परिषद व शासकीय शाळेचा दर्जा उंचावला आहे. त्यांचे घवघवीत यश आज दिसत असून सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना प्रशस्ती पत्र वितरण केले. सत्कार सोहळ्यात प्रास्ताविक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. अशोक कापगते यांनी केले तर संचालन शहराध्यक्ष दिलीप मासूरकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साकोली तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्षा छाया पटले, शहर अध्यक्षा पुष्पा कापगते, प्रतिनिधी एच. बी. भंडारकर, कृष्णा हुकरे, चंद्रकांत वडीचार, दिलीप निनावे, विवेक सोनु बैरागी, विजय साखरे भास्कर खेडीकर, दिपक थानथराटे, पराग कोटांगले, माधुरी रासेकर, मनोहर भिवगडे, विक्की राऊत, सतिश रंगारी आदींनी परिश्रम घेतले. तसेच या वेळेस विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले