कत्तलीसाठी निर्दयपणे वाहतूक होणाऱ्या १९ गोवंशाची सुटका
१८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई करत एकूण १९ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन बोलेरो पिकअप वाहनांसह १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही वाहनांचे फरार चालकांवविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५ ते ६ वाजता दरम्यान मौजा बेटाळा शेतशिवार परिसर करण्यात आली. महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ४० सीएम ८४९१ मध्ये ९ गोवंश जनावरे कोंबून वाहतूक करताना आढळले. नियमानुसार प्रति जनावरास २ बाय २ मीटर जागा बंधनकारक असताना अपुऱ्या जागेत, दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याशिवाय, तहानेने व्याकूळ अवस्थेत जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती. ९ जनावरे व बोलेरो वाहन असा एकूण ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जम करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई त्याच दिवशी सकाळी ५.३० ते ६.३० वाजता रोहा ते बेटाळा डांबरी रोडवर येथे झाली. बोलेरो क्रमांक एमएच ४० बीझेड ३०९७ मध्ये १० गोवंश अशाच क्रूर अवस्थेत आढळले. यात ४ पांढऱ्या, १ लाल-काळी, १ काळसर अशा ६ गायी ९० हजार रुपये व ४ पांढरे गोरे ४० हजार रुपये असे एकूण १० जनावरे १ लाख १३ हजार रुपये व वाहन ८ लाख असे एकूण ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जम झाला. फिर्यादी पोशि कोमल ईश्वरकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे हवालदार स्वप्नील मते हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शनत पोलीस हवालदार तुमाने, शिपाई ईश्वरकर यांनी केली आहे.








