मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची सार्वजनिक वाचनालयाला भेट

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- १६४ वर्षांपासून ज्ञान प्रसाराचे अविरत कार्य करणाऱ्या सार्वजनिक वाचनालय भंडाराला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन वाचनालयाच्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी सत्कार केला. आमदार नरेंद्र भोंडेकर, किरण पांडव यांचा सत्कार कार्यवाह प्रा. सुमंत देशपांडे यांनी केला. याप्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक वाचनालयाने जिल्ह्यातील झाडीबोली साहित्य संपदा व लोकसंस्कृतीच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा शासनस्तरावरून यासाठी आवश्यक ती मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यांनी वाचनालयाचे दुर्मीळ ग्रंथ विभाग, शिवकालीन होन व सार्वजनिक वाचनालयाच्या इतिहासाची माहिती घेतली. वाचनालयाच्यावतीने सुरु असलेल्या मोफत ग्रंथ प्रकाशन उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी सहकार्यवाह हर्षल मेश्राम, शेखर बाळा गभने, प्रा. नरेश आंबिलकर, प्रकाश मालगावे, अॅड. सुधीर गुप्ते, ईश्वरलाल काबरा, नीलकंठ रणदिवे, उद्धव डोरले, मंगला भोले, मदन बागडे, मंगला निंबार्ते, अविनाश पाठक, नितीन रासेगावकर, बिनोद आकरे, विशाखा गुप्ते, धनंजय ढगे, गुणवंत काळबांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, सुधीर खोब्रागडे, दिनेश हरडे, युवराज साठवणे, मारुती वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *