पदावर राहतांना कामे करणाऱ्यांच्याच मतदार आठवणीत ठेवतो

जिल्हा शिवसेना मेळाव्यात राज्य मंत्री सामंत यांचे वक्तव्य
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राजकारणात पद येतात जातात. परंतु, पदावर राहतांना कामे करणाऱ्यांच्याच मतदार आठवणीत ठेवतो. बाळासाहेबांप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण आज किती होत आहे? असा प्रश्न महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज उपस्थित केले. ते येथील बालाजी सभागृहात भंडारा जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे मार्गदर्शन करीत होते.

या मेळाव्यात भंडारा विधानसभेचे आम नरेंद्र भोंडेकर, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, भंडारा गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विलास चाबरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, आज समोर बसलेले कार्यकर्ते ज्या प्रमाणे हा भगवा दुपट्टा आपल्या खांद्यावर घेऊन बसले आहेत, तसेच सोबत असणाऱ्यांच्या खांद्यावर या दुपट्ट्याची जबाबदारी कशी देता येईल याचा विचार आज कार्यकर्त्यांनी करायचे आहे. तरच शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष होऊ शकेल.

स्थानिक प्रश्नांना समोत ठेवत मंत्री म्हणाले, भंडारा जिल्ह्याला मिळणाऱ्या निधी संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सौम्य भाषेत समज दिली आहे आणि त्यांनी आता भंडारायाला मिळणाऱ्या विकास निधी कसलीही कमतरता येऊ देणार नाही, अशी हमी दिली आहे. आज झालेल्या सभेत घेतलेल्या निर्णया नंतर जिल्ह्यात विकास कामांना गती मिळणार आहे. आणि आज घेतलेल्या या निर्णयांना जनसामान्यांपर्यंत पोहोचोवाल तरच जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होऊ शकेल. इतिहासात महिलांकरिता सर्वाधिक निर्णय घेणारे हे शिंदे साहेबच होते. तसाच आज एक निर्णय घेण्यात आला आहे कि भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाच्या ठिकाणी स्टील प्लांट लावला जाईल.

मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आ. नरेंद्र भोंडेकर आपल्या भाषणात म्हणाले की, त्यांनी वर्ष २००९ पासून राजकारणात आणी पक्षात भरपूर उतार चढाव बघितले. परंतु भगव्याची साथ सोडली नाही. २०२१९ या वर्षात आमदार असतांना निवडणुकी दरम्यान भरपूर ऑफर आले. परंतु आम्ही शिवसैनिकच राहिलो. विरोधकांनी शिवसेना मुरली असे म्हणणे सुरु केले. मी निवडणूक अपक्ष जिंकलो असलो तरीही दाखवून दिले की शिवसेना ही अस्तित्वात होती, आहे आणि पुढेही राहणार. आता शिवसेना हि विधानसभापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण जिल्ह्यात याचे अस्तित्व निर्माण झाले आहे. त्यांनी या मंचावरून घोषणा केली की जर लोकसभाचे परिसीमन झाले नाही तर पुढील खासदारकीची निवडणूक शिवसेनेकरिता मागतील आणि युतीदार देतील.

मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, उपजिल्हा प्रमुख विकास मदनकर, उप जिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उपजिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, उपजिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविताताई तुरकर, युवा सेना प्रमुख अंकुश वंजारी, नितीन सेलोकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गजभिए, न.प. गटनेता राजू धुर्वे, जिल्हा संघटक नितीन धकाते, भंडारा तालुका प्रमुख संजय आकरे, दतू जगनाडे, पवनी तालुका प्रमुख जितेश इखार, शहर प्रमुख नरेंद्र बुरदे व रोशन काटेखाये, माजी नगराध्यक्ष बाबू बागडे, मुकेश थोटे, नागपूर जिल्हा प्रमुख सुरज गोजे, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, भंडारा महिला तालुका प्रमुख विद्या मेहर सह साकोली आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याचे संचालन व आभार प्रदर्शन पवनी शहर प्रमुख अनिल धकाते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *