उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा भंडारा दौरा उद्योजकांशी संवाद

भंडारा :- महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
डॉ. सामंत यांचे सकाळी ९.३० वाजता इंडिगो विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता मोटारीने भंडारा येथे प्रस्थान करतील. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे भंडारा जिल्हा उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत संवाद साधतील.
दुपारी २ वाजता बालाजी हॉल व लॉन, साई मंदिराजवळ, जिल्हा परिषद रोड, भंडारा येथे शिवसेना जनप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मतदारसंघानिहाय आढावा बैठक होणार आहे.
दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीसह साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता डॉ. सामंत भंडारा येथून मोटारीने नागपूरकडे प्रस्थान करतील. रात्री ८.३० वाजता नागपूर येथे त्यांचे आगमन होईल.








