ओबीसी प्रवर्गाची ओबीसी कॉलम सहित जातनिहाय जनगणना करा, आंदोलनाचा १०० वा दिवस
उपोषणाला मंडपाला ॲड. प्रदीप ढोबळे यांची भेट; जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडारा द्वारा ११ मे २०२६ पासून ओबीसी प्रवर्गाच्या जनगणनेकरिता आंदोलन सुरू असून त्या साखळी उपोषणाचा १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ॲड. प्रदीप ढोबळे यांनी उपोषण मंडपाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन पाठवण्यात आले.
१६ मे २०२६ पासून पहिल्या टप्प्याची घरगणना नावाखाली गणना करण्यात आली व राजपत्रामध्ये ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे समितीने जनगणनेवर बहिष्काराचे आवाहन केले होते. दुसऱ्या टप्प्यात एससी, एसटी प्रमाणेच ओबीसीचा कॉलम राहील व ओबीसी प्रवर्गाची जनगणना होईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते पण त्याची पुर्तता झाली नाही. यासाठी हे सुरू असलेले आंदोलन सुरूच राहील तसेच येत्या पंधरवड्यात ओबीसी संघर्ष समिती द्वारे तालुका तालुक्यात आणि जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याची सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. याचे लोन संपूर्ण देशभर पोहोचणार आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या राजपत्रामध्ये एससी, एसटी प्रमाणे ओबीसी कॉलम टाकावा व ओबीसींची फसवणूक करू नये प्रवर्गानुसार जनगणना करावी सन २०१८ व २०२५ मा. मंत्र्यांनी कॉलम सह जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. पण राजपत्रामध्ये दहाव्या प्रश्नात ओबीसी कॉलम नाही याचा अर्थ सरकार लबाडी करत आहे असे दिसून येते तरी तो कॉलम यावा व ओबीसींची एससी एसटी प्रमाणे ड्रॉप डाऊन मेनू टाकून जनगणना करावी. ओपन प्रश्न ठेवून निव्वळ जात लिहू नये.
यावेळी ॲड. प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आला. तेव्हा मुख्य समन्वयक सदानंद ईलमे, प्रभाकर वैरागडे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर, भगीरथ धोटे, भैय्या लांबट, बबलू कटोरे, सावन कटोरे, उमेश शेंडे गोंदिया, डॉ. अनिल डहाके, नंदू नागरकर चंद्रपूर, डॉ. रमेश पिसे नागपूर, विलास काळे यवतमाळ, रामचंद्र तरोणे, रोशन उरकुडे, रमेश शहरे, पंजाब कारेमोर्रे, धनंजय बिरणवार, किशोर डोकरीमाने, तुळशीराम बोंदरे, माणिकराव कुकडकर, ललिता देशमुख, लता बोरकर, शुभादा झंझार्ड, रंजना गभणे, केशव अतकरी, सेवक हजारे, माधुरी खंडीईत, श्रीकृष्ण पडोळे मनोहर टिचकुले, अरुण जगनाडे, विष्णू जगनाडे, भोजराज गभणे, सुधाकर मोथुलकर, उपस्थित होते.








