शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश करून शिवबंधन बांधले
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हा पदाधिकारी बैठक भंडारा गोंदिया लोकसभा संपर्कप्रमुख श्री राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाप्रमुख संजय रेपांडे, विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक, महेश पाटील, जिल्हा संघटक लवकुश निर्वांण, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, महिला आघाडी संपर्क संघटिका करुणाताई शिंदे, महिला आघाडी जिल्हा संघटिका रश्मीताई पातुरकर, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत साकुरे हॉटेल बैठक हॉल जि प. चौक येथे पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जिल्ह्यात प्रथम आगमना निमित्त लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख राजू पाटील यांचे व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तदनंतर प्रमुख मान्यवरांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा संपर्क संघटिका करुणाताई शिंदे यांनी जिल्ह्यात महिला आघाडी संघटना वाढवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, जेणेकरून जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम करता येईल असे आवाहन केले. विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी जिल्ह्यात गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे धोरण राबविताना स्थानिक जनतेच्या प्रश्नांना हात घालण्याचे आवाहन केले.
जिल्हाप्रमुख संजय रेपांडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखjun आपल्या क्षेत्रात संघटनात्मक बांधणीला वेग देण्याचे आवाहन करीत शेतकरी आणि सामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणींच्या धावून जाऊन सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवून, नुकतेच राज्य सरकारने जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या भागांमध्ये पंचनामे व्यवस्थित होत आहेत की नाही याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी भंडारा शहरातील, पवनी तालुक्यातील आणि वरठी येथील अनेक तरुणांनी पक्षामध्ये दुपडे घालून, शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश देण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना लोकसभा संपर्कप्रमुख राजू पाटील यांनी पक्षाचे बी. एल. ए. २ यांना एस. आय. आर.. प्रक्रियेत सक्रिय राहून मतदारांचे नाव यादीतून कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष देऊन पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत, जि. प., पं. स. निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी तयारीला लागून सज्ज होण्याचे आवाहन करीत लवकरच त्या संबंधाने जिल्हा दौरा करण्याची त्यांनी आश्वासन दिले.
पक्षप्रवेश घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने यश पारधी, संकेत कोसरे, विश्वजीत पांडा, डेव्हिड पाटे, आयुब डाकरे, प्रणव डाकरे, एकनाथ मोहोंटुरे, आबर्न बाोंदरे, वैभव पारधी, मृणाल शामकुवर, प्रिंस लांजेवार, अनुज बांगरे, रितेश मेश्राम, देवेंद्र गभणे, प्रन्वल मडाम्मे, साहित बैलमारे, सुरज भोवते, श्रीकांत सार्वे, रोहन राहांगडाले, गौरव झंजाळ, कृष्णा नागपुरे, सी सुष्मा मोहोळ, निषाद कटरे, मनोज चिमनकर, देवराम भोवते, अनिल गोस्वामी, नितेश चिमनकर, चंद्रशेखर लाखे, किशोर खोब्रागडे, सुनील सावरकर, गणेश गायधने, देवदास मेंढे, प्रणय गिरडकर, मयंक उपरीकर, मयूर उपरीकर, जितू खोब्रागडे इत्यादींनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.
शिवसेना (उ. बा. ठा) पदाधिकारी बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हा संघटक लवकुश निर्वांण, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका रश्मीताई पातुरकर, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख ईश्वर भोयर, प्रवीण गावधने, तिलक सार्वे, दिनेश नंदपुरे, विधानसभा संघटक शोभाराम तिजारे, राधेश आघे, प्रशांत देशमुख, मयूर जोशी, प्रकाश गभणे, विशाल भुरे, चित्रागंध सेलोकर, हर्षल टॅम्पूरर, राज बधवानी, अतुल मिरासे, प्रकाश निनावे, रोशन ठेलकर, संतोष चांदवार, सोमेश्वर सेलोकर, हिमांशू भाजीपाले, अरविंद ठक्कर, होमराज उपरीकर, तालुका संघटक विनायक सरोदे, उप तालुकाप्रमुख सत्यनारायण कामथे, गुरुदेव साकुरे, अनिल माहुले, गोवर्धन मारवाडे, कैलास कनपटे, हनुमान शेंड विभाग प्रमुख निखिल बशिने, राजेश कांबळे, विलास बुराडे, रसिक खोब्रागडे, रवी बांते, पितांबर खंडाते, आकाश कंगाल, तुलसीदास मेश्राम, संजय मैंद, प्रदीप सातवणे, ऋषभ नागपुरे, शारिक शेख, ताराचंद अतकरी, शुभम निमजे, वैभव भुरे, अनिल चोले, इत्यादी शेकडो शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.








