संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एक लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- आज दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्दे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत देण्यात आले.
संपूर्ण भंडारात कमी पाऊस पडलेला आहे, तसेच उरलेल्या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. असे असतानाही जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर हे तीन तालुके शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी एक लाख रुपये सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे देण्यात आले.
याप्रसंगी हेमंत महाकाळकर, नरेंद्रजी झंझार्ड, देवचंद ठाकरे, विजय सावरबांधे, राजु भाई पटेल, यशवंत सोनकुसरे, उमेशजी तुरकर, योगेश सिंगनजुळे, बाळूभाऊ चुन्ने, उमराव आठोडे, पवन चव्हाण, नागेश भगत, धनराज चौधरी, मंजुषा बुरडे, धनु व्यास, सदाशिव ढेंगे, गणेश चौधरी, सुरेशसिंग बघेल, अंगराज समरीत, उत्तम कडपाते, मनीष वासनिक, भानुदास बनकर, आशिष नंदागवळी, कीर्ती गणवीर, अमन मेश्राम, शुभम सार्वे, संजय नहाले, मंगेश रेहपाडे, महेश भोंगडे, दिनेश हरडे, लता मेश्राम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








