स्वाभिमानी वृत्तीने राष्ट्ररक्षणासाठी एकत्र येणे ही काळाची गरज

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- कितीही कठीण परिस्थिती असली तरी धैर्याने आणि स्वाभिमानाने देशाच्या व समाजाच्या रक्षणसाठी लढा देण्याची वेळ येते. तेव्हा प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे. शहीद अवंतीबाई यांच्या जीवनकार्यातून शिक्षण, सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेमीची प्रेरणा युवा पिढीने घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांनी केले.

अमर वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांच्या १९५ व्या जन्मजयंतीनिमित्त रविवारी, १६ ऑगस्ट रोजी भंडारातील देशबंधू वॉर्डातील रवींद्रनाथ टागोर पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मधुरा मदनकर उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक रामकृष्णा माहुले, नगरसेविका रुपाली नेवारे, वृषाली ब्राह्मणकर आणि नगरसेवक नितीन गायधने, आलोकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील नागपुरे यांची व्यासापिठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन धनंजय बिरणवार तसेच आभार देवेंद्र लिल्हारे यांनी मानले.

कार कार्यक्रमासाठी रवींद्र नागपुरे, दुर्गाप्रसाद दमाहे, सुमित माहुले, रोखपाल सुलाखे, पन्नालाल उपवंशी, पंढरीनाथ कस्तुरे, योगेश दमाहे, राधाकृष्ण माहुले, पराग ठाकरे, निलेश सव्वालाखे, मोहन माहुले, वैभव माहुले, संजय बघेले, यशवंत ठाकरे, बंडू (सुनील) नागपुरे, वर्षा ठाकरे, पूजा सव्वालाखे, अनिता मुटकुुरे, संगीता नागपुरे, सचिन माहुले, प्रतिभा बघेले, विनोद सव्वालाखे, रमेश सव्वालाखे, रमेश नागपुरे, कंकर अठाये, संजय माहुले, गजानन गरडे, चंद्रशेखर मुटकुुरे, गिरीधर बंभाटे, विेंद्र ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *