चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
मुंबई:- शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मोठा ट्जिस्ट आला आहे. या आधी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायालयाच्या घटनापीठाने शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे, त्याचा फेरविचार करावा अशी मोठी मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. घटनापीठाच्या त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला आणि त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना दिली. त्यामुळे त्या निर्णयावर सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेरविचार करावा, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली,








