भाजप भंडारा जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- भारतीय जनता पक्षाच्या भंडारा जिल्ह्यातील संघटनात्मक व आगामी कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण जिल्हा आढावा बैठक दसरा मैदान, भंडारा येथील चरण सभागृहात पार पडली. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून पंकज भोयर, पालकमंत्री उपेद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र, संजय भेंडे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवीण दटके, विधानपरिषद आमदार व विदर्भ संयोजक भाजपा डॉ. परिणय फुके, विधानपरिषद आमदार मा. डॉ. सूर्यवंशी, विदर्भ सहसंयोजक बाळाभाऊ अंजनकर, लोकसभा समन्वयक व लोकसभा संपर्कप्रमुख मा. सुधाकर कोहळे, पदवीधर नोंदणी प्रभारी, नागपूर विभाग तसेच मा. अविनाश ब्राह्मणकर, विधानपरिषद आमदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष मा. आशिष (आशू) गोंडाणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक बांधणी, मतदार नोंदणी, शक्तिकेंद्र व बूथ पातळीवरील कामकाज तसेच पक्षाच्या विविध आगामी उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ पातळीपर्यंत प्रभावीपणे काम करावे, असा मार्गदर्शनपर संदेश दिला. जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध सूचना व दिशा-निर्देश देण्यात आले. या आढावा बैठकमुळे भाजपा भंडारा जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा व ऊर्जा मिळाली असून आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकत अधिक भक्कम करण्याचा निर्धार करण्यात आला.








