पिंपळगाव सडकच्या भीषण अपघातानंतर लाखनी पोलीस काही धडा घेतील का?

अवजड वाहने बिनधास्त रस्त्यावर

केसलवाडा फाटा ते गडेगाव फाटा बाजू अतिशय धोक्याची

दै. लोकजन वृत्तसेवा

लाखनी :- अगदी पोळ्याच्या दिवशी पिंपळगाव / सडक जवळ रस्त्यावर आलेल्या वाटामुळे भीषण अपघात झाला आणि या अपघातात नऊ लोक नाहक जीवावाला मुकले. तरी सुद्धा पोलिसांनी कोणताही धडा घेतल्याचे दिसून येत नाही.

याचे कारणच मुळातच नियमबाह्यपणे रहदारीचे नियम तोडून रस्त्यावर उभे असणारे अवजड वाहन आहे. घटना मनाला सुन्न करणारी, वेदना देणारी होती. नियमांची पायमल्ली करून रहदारी कायद्यांचा धाक न ठेवता बिनधास्तपणे छोट्या छोट्या हॉटेलच्या कडेला मोठे लांबलचक अवजड वाहने उभी करणे हेच निदर्शनास येत आहे. नॅशनल हायवे असल्या कारणाने सुसाट वेगाने गाड्या येतात अचानक रस्त्यावर उभी असलेली अवजड वाहने चालकाच्या लक्षात येत नाही व अपघात घडतो व नाहक निष्पाप माणसं जीवावाला मुक्तात्.

आता नव्याने केसलवाडा फाटा ते गडेगावफाटा च्या मधात उत्तर दक्षिण बाजूला अगदी रस्त्यावर छोट्या दुकानांपुढे ट्रकची थांबणारी गर्दी, तरुणांच्या मोटरसायकल हमखासपणे उभ्या दिसतात. या दुकानांमध्ये असे विशेष काय मिळते याचा देखील पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. याबद्दगर्दी बहल वेगवेगळ्या चर्चा लाखनी परिसरात होताना दिसून येत आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तरे कडे डाव्या बाजूला सिद्धििवनायक नावाची कॉलनी वसलेली आहे. या कॉलनीतील विद्यार्थी व जनतेला बाहेर निघण्याचा दुसरा पर्यायी मार्ग कोणताही नसल्यामुळे या कॉलनीतील विद्यार्थ्यांना व जनतेला सर्वांना राष्ट्रीय महामार्गावर यावेच लागते. त्यांना लाखनीत येण्यासाठी हळूहळू विरुद्ध बाजूनेच केसलवाडा फाट्याकडे यावे लागते. जीव धोक्यात घालून हे नागरिक व शालेय विद्यार्थी ट्रकाच्या बाजू बाजूने वाट काढ़त येण्याचा प्रयत्न करीत असतात. या संदर्भात कॉलनी वासियांनी गडेगाव ट्रॅफिक पोलिसांना लेखी तक्रारी देखील दिल्या आहेत. या तक्रारीचे काय झाले माहित नाही पण दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक उभे असलेले येथे दिसतील. हे चित्र ट्रॅफिक पोलिसांना पण दिसत असेलच.

येथे एखादी घटना घडू नये आणि म्हणून तात्काळ पोलिसांनी केवळ धाक न दाखवता चालान करून यांच्यावर धाक बसवला पाहिजे. या रस्त्यावरील दुकानांबद्दल आणि होणाऱ्या वाहनांच्या गर्दीबद्दल ज्या चर्चा होत आहेत. त्या चर्चांचा शोध देखील घेतला पाहिजे. अन्यथा एखादी घटना घडल्यावर उपचार करून काहीही उपयोग होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *