वडेगावात दूषित पाण्याचा कहर अतिсаराने ४५ जन बाधिता…पाच दिवसांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ चार गंभीर रुग्ण देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल

पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाण्यामुळे अतिсаराची साथ पसरल्याने ग्रामस्थांच्या ĉिंतेत भर पडली आहे. ६ ऑगस्टपासून गावात अतिсаराचे रुग्ण आढळून येत असून, अवघ्या पाच दिवसांत तब्बल ४५ जण बाधित झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. यापैकी प्रकृती गंभीर झालेल्या चार रुग्णांना देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, मुल्ला यांच्या अंतर्गत आरोग्य विभागाचे पथक ६ ऑगस्टपासून वडेगावात तळ ठोकून आहे. बाधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकृष्ण येरणे यांनी परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगितले.

पाच दिवसांत ४५ रुग्ण आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार ६ ऑगस्ट रोजी २२, ७ ऑगस्टला ७, ८ ऑगस्टला ३, ९ ऑगस्टला ३, तर १० ऑगस्ट रोजी १० रुग्ण आढळले. अशा प्रकारे बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. सुरुवातीला झालेली रुग्णसंख्येची झपाट्याने वाढ ही आरोग्य यंत्रणेसाठी ĉिंतेची बाब ठरली.

पाणी पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गावात नागरिकांसाठी तीन बोरबेल, तीन सौरपंप तसेच नळ योजनेच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, या टाक्यांची नियमित स्वच्छता व देखभाल झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन आजाराला निमंत्रण मिळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, दूषित पाण्याचा नेमका स्रोत अद्याप स्पष्ट झालेला नाही.

सभापतींचा पाहणी दौरा
परिस्थितीची माहिती मिळताच सभापती अनिल बिसेन यांनी वडेगावात पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षित पाणीपुरवठा आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य विभागाने परिस्थिती आटोक्यात आल्याचे स्पष्ट केले असले, तरी ‘साथ थांबली म्हणजे प्रश्न संपला’ असे म्हणता येणार नाही. पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता, पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी आणि दूषित पाण्याचा स्रोताचा शोध घेणे आवश्यक आहे. अन्यथा आजाराचे सावट पुन्हा गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘स्वच्छ पाणी, निरोगी समाज’ हीच ग्रामविकासाची खरी कसोटी असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *