कवडसी व पेट्रोलपंप ठाणा येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने मंडल यात्रेचे स्वागत
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याची भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतली आहे. याच मागणीला बळ देण्यासाठी आज ०३ ऑगस्ट पासून मंडल यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचा शुभारंभ त्रिमुती चौक भंडारा येथून करण्यात आले या वेळी यात्रेचे स्वागत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारातील कवडसी फाटा व पेट्रोलपंप ठाणा येथे भव्य स्वागत करण्यात आले. महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. आज ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट अशी यात्रा राहणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी ओबीसी चे नेते विजय वडेट्टीवार व ओबीसी कोराम उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.
राज्यभर ओबीसी समाजाला एकत्र आणत जातनिहाय जनगणनेच्या मागणीला अधिक बळ देण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेचा शेवट ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे होणार आहे. यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते, माधुरी साठवणे, योगिता धांडे, शामला कोहपरे, प्रमिला शहरे, पूजा पाटील, कीर्ती भांडारकर, स्वप्नाली उके, भाऊ कातोरे, मनीषा भांडारकर, सुरेंद्र सार्वे, प्रवीण घारडे, विजय चवळे, सुखराम रेहपाडे, शेषराम देवगडे, पडोळे काका, स्नेहा मेश्राम, नम्रता बागडे, शाहीूल उके उपस्थित होते.
प्रतिक्रिया ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते, यांनी जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी समाजाचे हक्क आणि निधीचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. मंडल यात्रा ही ओबीसी हक्कासाठीचा एल्गार असून शासनाने मागण्या मान्य करावे. न केल्यास यात्रेचे रूपांतर महाआंदोलनामध्ये होईल.









