जिल्हाधिकाऱ्यांचा युवकांशी ‘थेट कनेक्ट’ ; प्रश्न युवकांचे : उत्तर जिल्हाधिकाऱ्यांचे !
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ‘प्रशासन तुमच्यासाठी आहे. तुमचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर मार्ग काढणे ही आमची जबाबदारी आहे’ या सकारात्मक भूमिकेतून भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तुमसर तहसील कार्यालयात आयोजित ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ कार्यक्रमात युवक-युवतींशी थेट संवाद साधला.
युवकांनी महिलांवरील अन्याय, महिला सुरक्षा, रोजगाराच्या संधी, सरकारी नोकरीचे आकर्षण, भविष्यातील करिअरची चिंता, व्यवसाय व स्वयंरोजगार, महाविद्यालयीन समस्या तसेच बससेवेतील अडचणी यासह विविध प्रश्न मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी
युवकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेत मार्गदर्शनपर उत्तरे देत संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, उपविभागीय अधिकारी गणेश दिघे, तहसीलदार उपेश अंबादे, नायब तहसीलदार जांभूळकर याचसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तुमसर नगरीतील विविध विदयालयातील विद्यार्थीनी जिल्हाधिकारी महोदयांशी थेट संवाद साधून समाधान व्यक्त केले








