ओबीसी संघर्ष समितीने भंडारातून फुंकले ‘मंडल यात्रे’चे रणशिंग

विदर्भातील ११ जिल्ह्यांत ओबीसी जनगणनेसाठी करणार जनजागृती
दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा : ओबीसींची जातिनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी तसेच ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी ‘सकल ओबीसी महामोर्चा’च्या वतीने विशेष आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज ३ ऑगस्ट रोजी ‘५ वी मंडल जनगणना यात्रा’ काढण्यात आली.

ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून या यात्राचा शुभारंभ मंडल यात्रेचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वत भंडारातील त्रिमूर्ती चौकातून करण्यात आला. ही मंडल यात्रा दि. ९ ऑगस्टपर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांत ओबीसी जनगणनेसाठी जनजागृती करणार असून, जातिनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाला दरवर्षी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम देऊन तातडीने जातिनिहाय जनगणना करावी, केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, तसेच सरकारी सेवांमधील सुमारे १ लाख पदांचा बैकलॉग तातडील भरावा, अशा ठळक मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी ओबीसी नेते आ. विजय वडेट्टीवार, भारतीय मागास संघाचे रमेश पिसे, डॉ. बेले वर्धा, डॉ. अनिल डहाके चंद्रपूर, उमेश कोरोम, ओबीसी संघर्ष समितीचे मुख्य संयोजक सदानंद इलमे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रोशन उरकुडे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर, के. झेड. शेंडे, शरद इटवले, रमेश शहारे, मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, सुरेश खंगार, रोशन जांभुळकर, सुधाकर मोथुलकर, सुभाष् पाल, विष्णूज जगनाडे, पंजाबराव कारেমोरे, भैय्याजी लांबट, मोथुलकर, राजकुमार लांजेवार, श्रीकृष्ण पडोळे, अजाबराव चिचामे, उमेश सिंगनजुडे, यानचंद जांभूळकर, दिलीप चोपकर, मुकुंदा पाचे, श्रीराम बोरकर, कमलेश सार्वे, परमेश्वर बलके, रंजित कोल्हटकर, असित बागडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *