आमदार राजुभाऊ कारेमोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!
तुमसरमध्ये आरोग्य तपासणी, रक्तदान, रुग्णांना फळ व ब्लैंकेट वाटप
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असणारे तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. राजु कारेमोरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमसर येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बळीराजाच्या दुःखात सहभागी होत ‘जनसेवेचा संकल्प’ या भावनेतून नगराध्यक्ष इंजि. सागर विद्या मनोहर गभने व आ. राजु कारेमोरे मित्र परिवाराच्या वतीने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना फळे व ब्लैंकेटचे वाटप करण्यात आले. रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता आणि मानुषकीचा प्रत्यय देण्यात आला.
नंतर आ. राजु कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बासोबतच भव्य रक्तदान शिबिरी पार पडले. आरोग्यविषयक जनजागृती आणि गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमांना नागरिक व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दुपारी श्रीकृष्ण गोशाला, तुमसर येथे गोमाता पूजन व गो-रोटी, गूळ वाटपाचा संस्कारक्षम कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आ. राजु कारेमोरे काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने धर्मपत्नी रंजीता राजु कारेमोरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवित गोमाता पूजन केले व गोसेवेचा उपक्रम पार पाडला.
यावेळी नगराध्यक्ष इंजि. सागर विद्या मनोहर गभने यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ‘वाढदिवस म्हणजे केवळ आनंदाचा उत्सव नसून समाजासाठी काहीतरी देण्याची आणि गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची संधी आहे. आ. राजु कारेमोरे यांच्या सामाजिक विचारार्ना अभिप्रेत असलेल्या शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या हिताचा संकल्प पुढे नेत अशा सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
आम. राजु कारेमोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी, आरोग्यसेवे, रक्तदानाचे महत्त्व आणि गोसेवेचा संदेश देण्यात आला. वाढदिवसाला समाजोपयोगी कार्याची जोड देत आनंदाचा क्षण समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करण्याचा एक स्तुत्य उपक्रम यानिमित्ताने तुमसरमध्ये पाहायला मिळाला.
या संपूर्ण सामाजिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये नगराध्यक्ष इंजि. सागर विद्या मनोहर गभने यांच्यासह नगरसेवक तिलक गजभिये, यासीन छवारे, गुलराज कुंदवानी, सुनिल डोंगरे, चक्रधर बिसने, योगेश सिडाम, नगरसेविका वैशाली हिंगणे, स्मिता अथिलकर, विक्रम लांजेवार, जाकिर तुरक, प्रदीप भनेकर, मोंटू चोपकर, नानू परमार, सुनील थोटे, राहुल रनदिवे, बापू बडवाईक, आयुष् कुंजेकर, सुमित लोखंडे, मिलिंद गजभिये, दुर्गेश राउट, मिना गाढवे, नेहा मोटघरे, नंदा डेंगले, करुणा धुर्वे, प्रीति मलेलावर, संकेत गजभिये, शेखर मलेलावर, मनोज उखरे, सोनू तरारे, दिपेश गलबले यांच्यासह मित्र परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.








