चोरीस गेलेला ५.५० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल केला परत

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- पोलीस अधीक्षक नूरुल हसन (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ फिर्यादीस सन्मानपूर्वक परत केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिस स्टेशन गोबरवाही येथे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहिता अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करून न्यायालयात सादर करण्यात आला होता. सदर जप्त केलेला मुद्देमाल प्रथम श्रेणी न्यायालय, तुमसर यांच्या आदेशान्यये फिर्यादी श्रीमती सुनीता आनंदराव गेडाम, रा. गोबरवाही यांना त्यांच्या सुपूर्तनाऱ्यावर दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करण्यात आला.

परत करण्यात आलेल्या या मौल्यवान मुद्देमालामध्ये २० हजार रुपये किमतीची ओम असलेली एक सोन्याची चैन (अंदाजे ७ ग्राम ४४० मिलीग्राम), ६० हजार रुपये किमतीची कानातील लांबसर झुमक्याची एक जोडी (अंदाजे ६ ग्राम २०० मिलीग्राम), ६० हजार रुपये किमतीचे एकदानी सोन्याचे ३० मणी आणि एका पारदर्शक प्लास्टिक डब्यात ठेवलेले तब्बल ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र (अंदाजे ४० ग्राम) असा एकूण ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व त्यांच्या तपास पथकाने पार पाडली. आपले दागिने परत मिळाल्याने फिर्यादी सुनीता गेडाम यांनी पोलिस प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *