जनगणनेेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेवर बहिष्कार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- २०२६-२७ च्या जनगणनेेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी संघर्ष समिती जिला भंडारा यांच्यावत्तीने दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी powin सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. बेमुदत साखळी उपोषण मंडपात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष समिती व सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, संजय मते, मंगला वाडीभस्मे, रमेश सहारे, रोशन उरकुडे, पंजाब कारेमोरे, विष्णुदास जगनाडे, अरुण जगनाडे, तुळशीराम बोंद्रे, मनोहर टिवकुले, सुधाकर मोथाळकर, गजानन पाचे, मुकुंदा पाचे, राजू बंजारी, प्रफुल सुखदेवे, विलास मरस्कोले, दुर्बोधन अब्रकारी, सुभाष ऊर्फे, भाऊ कातोरे, दिलीप मडामे, धनराज चांचरे, विष्णुदास लोणारे, हरिदास जांगळे, रमेश बंजारी उपस्थित होते.
यावेळी सांगण्यात आले की, केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ ला जातिनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला होता. मात्र जनगणनेेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवता ओपन एंडेड पद्धत अवलंबली जात आहे. २०११ च्या एस.ई.सी. मध्ये याच पद्धतीमुळे ४६ लाख ७० हजारांहून अधिक जाती-पोटजातींची नोंद होऊन डेटा सदोष ठरला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ नये.
१६ मे २०२६ पासूनच्या घरगणनेत ओबीसी कॉलम नव्हता, म्हणून ११ मे २०२६ पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातही एससी, एसटी, जात असेच कॉलम असून ओबीसी वगळण्यात आला आहे. ‘स्वतंत्र कॉलम नसेल तर ओबीसीचा सहभाग नसेल’ अशी ठाम भूमिका घेण्यात आली. केंद्राने सुधारणा न केल्या스 देशभर आंदोलन व दिल्लीत धरने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
मागण्यांमध्ये स्वतंत्र ओबीसी कॉलम व ड्रॉपडाउन यादी, १०० टक्के शिष्यवृत्ती, लोकसंख्येनुसार बजेट तरतूद, स्वामिनाथन आयोग लागू करणे, कर्जमुक्ती, बोनस, प्रति हेक्टरी २५ हजार दुष्काळी मदत, २४ तास वीज, सरकारी शाळा बंद न करणे, क्रीमीलेयर अट रद्द करणे, पदोन्नतीत आरक्षण यांचा समावेश आहे. मोर्चासाठी संत तुकाराम सभागृह (बावणे कुणबी समाज) गांधी चौक येथे एकत्रीकरण होऊन जalaram सभागृह, गांधी चौक, बस स्टंड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयरावर मोर्चा धडकणार आहे.








