दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रिम मदत जाहीर
भंडारा जिल्ह्यात २.०६ लाख शेतकरी पात्र
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५,००० रुपये अग्रिम मदत थेट बैंक खात्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार मूल्यांकन करून राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील सुमारे १.५ कोटी पात्र शेतकऱ्यांना अग्रिम मदत देण्यासाठी एकूण ७,५०० कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने दि. २७ ऑक्टोबर २०२६ च्या बैठकीत मान्यता दिली. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून २,००० कोटी व ‘उणे प्राधिकार’द्वारे ५,५०० कोटी अशी तरतुद करण्यात आली हा निधी कार्यरसन मदत-३ मार्फत वितरीत केला जाईल.
यात भंडारा जिल्ह्यातील ट्रिगल १ व ट्रिगल २ मध्ये पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी व लाखांदूर तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील ५ तालुक्यांत एकूण २,०८,६९५ शेतकऱ्यांचे ७७,८१८.४४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यांना एकूण अपेक्षित निधी सुमारे १३३.९४ कोटी रुपये आहे.
निकाष असे : ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट ५,००० रुपये डीबीटीद्वारे मिळतील. १ नोव्हेंबर २०२५ नंतर ई-केवायसी केलेल्यांना पुन्हा केवायसीची गरज नाही. वनपट्टाधारकांना ई-केवायसीच्या आधारे मदत मिळेल. मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळवू नये, अशा सूचना बँकांना देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अिम मदत पीकनिहाय नंतर ठरणार असली तरी तातडीची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.








