‘पत्रकार भवनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’ ; खा. राजेंद्र जैन यांची ग्वाही
गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या नागरी सत्कार सोहळ्यात विकास, पत्रकार कल्याण आणि रेल्वे सुविधांवर भर; ‘स्व. मनोहरभाई पटेल पत्रकार भवन’ पूर्णत्वास नेण्याचा निर्धार
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राज्यसभेवर निवड झालेले खासदार राजेंद्र जैन यांचा शहरातील ग्रँड सीता हॉटेलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. पत्रकार, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा खासदार जैन यांनी केली. त्यामुळे दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या पत्रकार भवनाच्या उभारणीला नवे बल मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संघाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाने स्वतःच्या मालकीची जागा खरेदी केली असून, त्या ठिकाणी स्व. मनोहरभाई पटेल पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प केल्याची माहिती दिली. सुमारे २.५० कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे आतापर्यंत जवळपास २८ लाखांचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी आर्थिक सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर प्रतिसाद देताना खासदार राजेंद्र जैन यांनी, स्व. मनोहरभाई पटेल यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या या पत्रकार भवनाच्या कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. पत्रकारांसाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारणे हे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या भाषणात खासदार जैन यांनी राज्यसभेच्या जबाबदाऱ्यांचाही उल्लेख केला. केंद्र सरकारच्या रेल्वे समिती आणि कृषी समितीवर स्थायी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचे सांगत, मुंबई-गोंदिया दरम्यान स्लीपर वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या घोषणेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्रक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार विनोद अग्रवाल यांनीही पत्रकार भवनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसत्याचे सांगत, खासदार राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य तथा उद्योगज जायसवाल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कोलकात्यातील वाद्यवृंद आणि गायिका कु. निशा यांच्या ऑर्केस्ट्रने उपस्थितांची मने जिंकली, तर उदयपूरहून आणलेल्या सुमारे सहा फूट उंच मोरपिसांच्या भव्य हारने खासदार राजेंद्र जैन यांचा करण्यात आलेला सत्कार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमध्यात शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी खासदार जैन यांचा सत्कार केला. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन भारतीय परंपरेनुसार सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गोपाल अग्रवाल यांनी, तर आभार प्रदर्शन विष्णु शर्मा यांनी केले. पत्रकार संघाच्या या उपक्रमातून पत्रकार कल्याण, लोकप्रतिनिधींचा संवाद आणि जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. फगरवार, सरला चिखलोंडे, मोहिनी वराडे, अखिलेश ठाकूर, अखिलेश सेठ, कीर्ती पटले, सदाशिव वाघाडे, गणेश लांजेवार,लिकेश चिखलोंडे, भाऊलाल रहांगडाले,मदन चिखलोंडे,रमेश गौतम,मंगल ठाकरे,केबल रहांगडाले,दिनेश तुरकर,सुनील पटले, शेलेश वासनिक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमातून कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांमध्ये नव्या विश्वासाची भावना निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.








