अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने जनतेची सेवा करावी

आमदार राजू कारेमोरे : मोहाडीत जनसेवा साप्ताहचा समारोप

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- जनसेवा पंढरवा हा केवळ शासकीय उपक्रम नसून शासन आणि जनतेतील विश्वास दृढ करणारा प्रभावी दुवा आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळत असून जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण होत आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता व सकारात्मक दृष्टिकोण ठेवून जनतेची सेवा करावी असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी जनसेवा पंढरवयाच्या समारोप कार्यक्रमात केले.

जनसेवा पंढरवयाच्या समारोपाणिमित मोहाडी येथे आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांना देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ३१० लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले, तर नगरपंचायत क्षेत्रातील १३ लाभार्थ्यांना आखीव पत्रिका प्रदान करण्यात आल्या.

याशिवाय रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी ५० युवकांनी रक्तदान केले. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जनता दरबार, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

कार्यक्रमला आ. राजू कारेमोरे, जि. प. सदस्य तथा सभापती आनंद मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, जि. प. सदस्य देवा ईलमे, अनिता नलंगोपूलवार, महादेव पचघरे, उमेश पाटील, पंचायत समिती सभापती बाणा सवालाखे, उपसभापती आशा बोन्द्रे, पंचायत समिती सदस्य प्रीती शेंडे, देवचंद ठाकरे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी गणेश दिघे, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, गटविकास अधिकारी लिल्हारे, सहायक गटविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे, प्रमेश नलंगोपूलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविक तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले. संचालन माजी सभापती रितेश वासनिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *