भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पाक्षतर्फे स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी
दि. २२ ते २८ जुलै ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त भंडारा शहरात विविध उपक्रम
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- आज दि. २२/जुले २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय भंडारा येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत जनसेवा सप्ताह निमित्त भंडारा शहरामध्ये विविध कार्यक्रम करण्याच्या संकल्प करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्दे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम मावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्दे यांनी अजितदादा म्हणजे शब्दाला जागणारा कामाचा माणूस, दिलेला शब्द पाळणारा नेता महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये सिंचन प्रकल्प, सहकार क्षेत्रात त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.
प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी मनोगत व्यक्त करतांनी भंडारा जिल्हयाच्या सिंचन प्रकल्प विकासात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अजितदादांच्या पश्चात त्यांची उणीव नेहमीच जाणवते आणि त्यांच्या विचारांचा वारसा आजही कार्यकर्त्यांना ऊर्जा देतो असे ते म्हणाले. तसेच माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, प्रशांत देशकर, महेंद्र वाहाणे, मंजुषा बुर्डे, नरेंद्र झंजाड, मनिष वासनिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्योंक्रमाचे सूत्रसंचालन शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये डॉ. रविंद्र वानखेडे, सौ. नंदा झंजाड, शेखर (बाळाभाऊ) गभने, राजु सलाम पटेल, भोजराज वाघधमारे, प्रदिप सुखदेवे, आरजु मेश्राम, रुपेश खवास, राहुल निर्वाण, भानुदास बनकर, अरुण अंबाडे, अरुण भेदे, रविंद्र पवनकर, सुनिल मोगरे, रुपेश टांगले, राजश्री राखेडे, संजय वरगंटीवार, मुन्ना कलचुरी, खुशाल निपाने, अमित बिसने, निरज शहारे, निखिल केसलकर, अंकुश चुटे, दिनेश हरडे, योगेश धोंगडे, निशा राऊत, रेखा मेंढे, जयश्री मेश्राम, अनिता महाजन, किर्ती कुंमरे व मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.








