पेपरफुटी, भरती प्रक्रिया व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा

पंतप्रधानांच्या नावे मोहाडी तहसीलदारांना निवेदन; संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारचा एल्गार

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- देशातील नीट व महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणांसह विद्यार्थी-युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत मोहाडी येथे विद्यार्थी, युवक व नागरिकांच्या वतीने माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्यामार्फत पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात देशातील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुरक्षित करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीत सहभागी संस्थांना काळ्या यादीत टाकावे, छडअ व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, सर्व स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, पोलीस भरतीसह इतर शासकीय भरती तातडीने पूर्ण करावी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी हे निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली.

यावेळी पंचायत समिती सदस्य बबलू मलेवार, कैलास झंजाड, गौरव नवरखेले, तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, काँग्रेस शहराध्यक्ष विजय शहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य के. बी. चौरागडे, नगरसेवक सेवक चिंधालोरे, महेश निमजे, सरपंच रवींद्र बाबरे, अनिल न्यायखोर, अशोक मुत्कुरे, पुरुषोत्तम पात्रे, बबलू सय्यद, अशफाक सय्यद, सलीम शेख, किशोर भैराम, गौरीशंकर राऊत, महेश कांबळे, राहुल पाटील, देवराम निखाडे, सरपंच प्रकाश खराबे, मनोहर बुराडे, रवी थोडे, अफरोज पठाण, बालचंद बोंद्रे, मोनू खोब्रागडे, आदेश बढवाईक, आदित्य सुखदेवे, माजी सभापती देवा निखारे, शिवसेना (उबाठा) चे ओमप्रकाश ठोंबरे व रुपेश झंजाड, शाम साठवणे, रोहित पडोळे, जगन गोमासे, बलवंत पंचबुद्धे, राजेश निंबार्ते, एन. टी. तितिरमारे, बबलू मलेवार, मनोहर बुराडे, विजय बोदरे, विनोद साठवणे, विलास वाढीभस्मे, राजन बोंदरे, कामरेड बावणे, किशोर भैराम, समृद्ध भैराम, श्रेयस बन्सोड, प्रवीण झंजाड, लिलहारे, रूपचंद बांते, अरुण मुत्कुरे, विनोद पिंगरे, सलीम शेख, पुरुषोत्तम पात्रे, रवी थोटे, का. बबलू नानापूर, गजानन समरीत, निखिल खोब्रागडे, श्रीकांत भजे, सचिन राखेडे, देवानंद साहूसाखरे, अरुण समरीत, हिरालाल समरीत, अरुण सेलोकर, किरण झंजाड, अजबरराव गराडे, अफरोज पठाण, सुरेन्द्र बारई, अंकुश डमाहे, कैलास भगत, महेश कळंबे, मधुकर पटले, स्नेहल कळंबे, कपिल पुंडे, राधेश्याम बांडेबुचे, सेवकराम सर्वे, गुरुप्रसाद सेलोकर, विनायक मारवाडे यांच्यासह परिसरातील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेन्द्र बेलखेडे यांच्या नेतृ्वात पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *