नीट युजी पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ एआयएसएफ भंडारा च्या वतीने कँडल मार्च

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नीट युजी पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व जबाबदारीची मागणी तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीला घेऊन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन राष्ट्रीय परिषदेच्या हाकेला प्रतिसाद देत देशभरामध्ये १९ जुलै ला कँडल मार्च काढण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून एआयएसएफ भंडारा जिल्ह्याच्या वतीने रविवारी सायंकाळी ६ वाजता गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान कँडल मार्च रॅली काढण्यात आली.

देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि जबाबदार करण्यात यावी, अशी मागणी एआयएसएफ भंडारा व इतर संघटनांच्या वतीने करण्यात आली. नीट युजी पेपर लीग मुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पर्यावरण, शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारे सोनम वांगचुक तसेच जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन कर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा व्यक्त करत कँडल मार्च करण्यात आले.

कँडल मार्चमध्ये “शिक्षण हक्क आहे, व्यापार नाही’, “न्याय हवा, पारदर्शकता हवी’, “विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ बंद करा’ अशा घोषणा देत कॅण्डल मार्च काढण्यात आले. यावेळी कॉम्रेड विश्वजीत बनकर एआयएसएफ जिल्हासचिव भंडारा यांच्या नेतृत्वात मनोकामना भौतिक, खुशी गजभिये, आदित्य वंजारी, प्रलया मेश्राम, कॉ. हिवराज उके, कॉ. प्रियकला मेश्राम, कॉ. गजानन पाचे, ताराचंद देशमुख, सौरभ देशमुख, स्पंदन हुमणे, सीजेपी चे पायल सतदेवे, अर्पण गोस्वामी, शंतनु गभने, वायएसजे चे पदाधिकारी प्रमोद केसलकर, हेमा गजभिये, योगेश शेंडे, जितेंद्र कोसरे, प्रशांत मते व जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक तसेच इतर संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *