जिल्ह्यातील विविध शाळांतील ४२ विद्यार्थी देणार इस्रोला भेट

१३ ऑगस्ट २०२६ रोजी बंगळुरू येथे क्षेत्रभेटीचे नियोजन

दैनिक लोकजन वृत्तसेवा
साकोली :- सन २०२५-२६ या वर्षी जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनातील गुणानुक्रमे निवड केलेल्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रो, बंगळुरू व अगस्त्य फाऊंडेशन कृष्णम येथे आयोजित करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५-२६ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकूण ४२ विद्यार्थ्यांना इस्रो, बंगळुरू येथे भेटीची परवानगी प्राप्त झालेली आहे.

सन २०२५-२६ या वर्षी जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांपैकी गुणानुक्रमे निवड केलेल्या विद्यार्थ्यांची नावांची यादी यापूर्वी प्राप्त झाली आहे. सदर विद्यार्थ्यांची तालुका व शाळानिहाय यादी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाली असून या विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीसाठी होणाऱ्या प्रवासापैकी नागपूर ते बंगळुरू व परत बंगळुरू ते नागपूर असा प्रवास विमानाने केला जाणार आहे. सदर प्रवासासाठी विमानाची तिकीटे काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारा यांनी मागितली आहे.

यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील विविध शाळांतील प्रलय शिवणकर, अयान भैसारे, खेमेश्वरी मेश्राम, पराग निरगुडे, समीर बडोले, अश्मीरा शेख, चैताली भुते, शौर्य गोंडाने, आर्यन दहिवले, पलक लांडे, ओम सहारे, चेतन शिलार, हिमांशू झोड, हिमांशू भजने, अल्ताब शेख, शिबू बांते, पूर्वी मोहपुरे, प्रज्वल वनवे, धीरज बोरकर, लक्की बावणे, खेमंत सोनवणे, मनीष गहाणे, भावेश रोकडे, चिन्मय हटवार, आराध्या बावणकर, अर्णव वैद्य, देवांश पडोळे, सुमित भुते, ओम फुंडे, नैतिक सोनकुसरे, संस्कार बारई, रिहांश गौतम, सुजल डोंगरे, वेदिका रेहपाडे, खंडिनी मोरे, मयूर गौपाले, कुशल ठवकर, मयूर बोरकर, बंटी राधोते, अर्जुन आस्वलं, श्रद्धा बावणकर, यशवंत पाठेकर या ४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *