साकोली पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
१० जणांवर गुन्हा दाखल २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
दैनिक लोकजन वृत्तसेवा
साकोली :- साकोली पोलिसांनी चिंगी जंगलशिवार येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकूण २ लाख ७० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन साकोलीचे पोलीस उपनिरीक्षक बेडवाले यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी आरिफ रफिक शेख, (वय ४५), मुनेश्वर तुलाराम ताराम, (वय ३३) दोन्ही रा. नवेगावबांध, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया व अक्षय भिमराव सांगोडे, (वय ३३) रा. सौदळ, ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांना अटक करण्यात आले आहे. तर फरार असलेले इतर आरोपींमध्ये गणेश कापगते, विवेक बडोले, अनिल नैनराम, अरुण भोयर, प्रबिन मोटघरे, मिलींद बडोले आणि राजू राऊत यांचा समावेश आहे.
आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, विवो वाय-१९, विवो-यु सपन, विवो टी४० असे ३ अँड्रॉईड मोबाईल, पत्त्याचे ५२ पत्ते, जुनी फाटलेली दरी व ४ होंडा शाईन आणि १ हिरो एच.एफ. डील्लक्स अशा ५ मोटार सायकली असा एकूण २ लाख ७० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पो.स्टे. साकोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पो.नि. आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पो.उपनि. बेडवाले व साकोली पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.








