ध्येयावर लक्ष ठेवा यश हमखास प्राप्त होईल – शिक्षण उपसंचालक डॉ. सावरकर
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- आईवडीलच मुलांचे खरे हितचिंतक असतात पण मुलांना आई-वडिलांचे निर्णय आवडत नाहीत. आपल्यासाठी झटणाऱ्या आईवडिलांचा मानन्मान ठेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात ध्येयावर लक्ष ठेवल्यास त्यांना हमखास यश मिळेल असे प्रतिपादन विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांनी केले. त्या सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आयोजित गुणवंत व प्रज्ञावंतांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होत्या.
सार्वजनिक वाचनालय भंडाराच्या ईंदराज सभागृहात आयोजित या गुणवंत व प्रज्ञावंतांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते. विशेष अतिथी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, एलआयसी तुमसरचे विकास अधिकारी नरेशबाबू दिपटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नरेशबाबू दिपटे यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक करून मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून धनंजय दलाल यांनी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने गेल्या सदतीस वर्षांपासून सुरू असलेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याची पार्श्वभूमी सांगून वाचनालयाच्यावतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या सत्कार सोहळ्यात इयत्ता दहावीच्या स्टेट बोर्डात भंडारा येथून प्रथम आलेली कु. अंजली काळे, बारावीत प्रथम आलेली कु. गितिका धुत, मागासवर्गीयांतून दहावीत प्रथम आलेली कु. किर्ती भिवगडे, बारावीत मागासवर्गीतून प्रथम आलेली कु. सूचिता फुलझेले यांना चांदीचे पदक, सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डातून प्रथम सौम्य झंवर, डॉक्टरेट प्राप्त अनामिका अविनाश पाठक, पदव्युत्तर दंत परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम आलेली नमिरा सिद्दीकी, राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीत निवड झालेले आशुतोष पांडे, सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकातून शासकीय सेवेत निवड झालेले अंकिता मालखंडाळे, प्राची ब्राह्मणकर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात नूतन कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा, लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा, जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा, सेंट पीटर स्कूल भंडारा, सनफ्लॅंग स्कूल वरठी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा, महिला अध्यापक विद्यालय भंडारा, महिला समाज विद्यालय भंडारा, जेसीस कॉन्व्हेंट भंडारा, रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, सनिज स्प्रिंग्स डेल स्कूल भंडारा, महर्षी विद्या मंदिर भंडारा, रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना चांदीचे पदक व रोख रक्कम देण्यासाठी मदन बागडे, उमाबाई बडवाईक, किरण गडपाले, पराग महाकाळ, ललिता बडवाईक, रमेश आंबिलकर, सुलोचना गडपाले, गि-हे, माटुरकर, वाढई यांनी आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हर्षल मेश्राम यांनी करून दिला. आभार अविनाश पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. इंगोले, डॉ.मनोज झंवर, मंगला भोले, प्रीती कडव, धनंजय ढगे, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, डॉ. प्रकाश मालगावे, शेखर (बाळा) गभने, नितीन रासेगावकर, मदन बागडे, नीलकंठ रणदिवे, विनोद आकरे, नरेंद्र भुरे तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, दिनेश हरडे, सुधीर खोब्रागडे, युवराज साठवणे, मारुती वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.








