शिक्षक भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

खा. डॉ. प्रशांत पडोळे व जि. प. सभापती नरेश ईश्वरकर यांनी केले नेतृत्व

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे तात्काळ भरावीत, या प्रमुख मागणीसाठी खा. डॉ. प्रशांत पडोळे व जि. प. शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील विविध गावांतील शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या आंदोलनाची सुरुवात भंडारा तालुक्यातील रोहना येथील जिल्हा परिषद शाळा बंद करून सुरुवात करण्यात आली. शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाले आहे. अनेक वर्गांना शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, संतप्त पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद ठेवून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनकर्त्यांनी शासना विरोधात जोरदार घोषणा देत शिक्षक भरतीची मागणी लावून धरली.

मोर्चात सहभागी मान्यवर:
मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रशांत पडोळे जिल्हा परिषदेचे सभापती शिक्षण समिती नरेश ईश्वरकर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, जि. प. सभापती आनंद मल्लेवार, अनिता नलगोपलवार, शितल राऊत, जि. प. सदस्य मोहन पंचभाई, प्रेमदास बनवे, गंगाधर जिभकाटे, देवा इलम, राजू ढब्बाले, रसिका रंगारी, उमेश पाटील, विशाखा माटे, सुनीता नवघरे, पूजा हजारे, विद्या कुंभारे, रजनिश बनसोड, स्वाती वाघाये, मनिषा निंबाते, माजी जि. प. सदस्य रमेश पारधी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर, काँग्रेसचे मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, जिल्हा सरचिटणीस गजानन झंझाड, उमेश मोहंतुरे, पवन वंजारी, प्यारेलाल वाघमारे, अनमोल साखरे, नितीन भोयर, मुकेश ठवकर, विविध गावांतील सरपंच, पालक शाळा समितीचे अध्यक्ष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *