खांब तलाव चौकात शिवसेनेचा आंदोलन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: स्थानिक खांब तलाव चौकातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता आज शिवसेना द्वारे आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. नॅशनल हायवे विभागाच्या अंतर्गत असलेल्या या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती एका आठवड्याच्या आत करण्याचा इशारा देत हे आंदोलन स्थगित करण्यात आले. सोबतच रस्ता दुरुस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. भोंडेकर यांनी दिला.

उल्लेखनीय आहे की राजीव चौक ते शास्त्री चौकाकडे जाणारा भंडारा शहरातील एक मुख्य मार्ग आहे. या मार्गावर खांब तलाव चौक असून या चौकाच्या जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. अश्यात या ठिकाणी अपघात होणे रोजची बाब झाली आहे. ही बाब आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या पर्यंत येताच त्यांनी आज शिवसेने तर्फे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्र घेतला आणि आपल्या शिवसैनिकांसह खांब तलाव चौकात पोहोचले आणि रस्ता रोको आंदोलन सुरु केले. ज्या मुळे जवळपास २ तास या रस्त्याची वाहतूक खोळंबली होती. या ठिकाणी पोहोचताच नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी यांना बोलाविण्यात आले आणि रस्त्याची वास्तविकता त्यांना दाखविण्यात आली. यावर अधिकाऱ्यांनी रस्ते दुरुस्ती करिता १५ दिवसांचा वेळ मागितला परंतु या रस्त्यावर होत असलेले अपघात पाहता आ. भोंडेकर यांनी सात दिवसांचा वेळ देत रस्ते दुरुस्त न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असा इशारा दिला व आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, शहर प्रमुख नरेंद्र बुरडे, शहर प्रमुख रोशन काटेखाये, जिल्हा संघटक नितीन धकाते, विनय मोहन पाशिने, सतीश तुरकर, दिनेश गजभिये, नरेश झलक, माजी नगर सेवक बंटी मिश्रा, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, संतोष त्रिवेदी, विक्की रावलानी, अर्चना श्रीवास्तव सह अन्य शिवसैनिक सहभागी झाले.

संबंधित विभाग हे केंद्र शासनाच्या अधीन येतो, अश्यात या रस्त्या संदर्भात खासदार महोदय काही पवित्र घेतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांची जाणीव होत नाही आहे. म्हणून नागरिकांच्या समस्यांची जाणीव खासदारांना व्हावी या करिता आम्हाला रस्त्यावर उत्तरा लागले. येत्या सात दिवसात हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर पुन्हा आंदोलनाची आमची तयारी आहे.
आम. नरेंद्र भोंडेकर, भंडारा पवनी विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *