अवैध रेती, तंबाखू आणि दारू प्रकरणात ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

तुमसर पोलिसांची धडक कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- तुमसर पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ०४ जुलै २०२६ रोजी राबवलेल्या कॉम्बिग ऑपरेशनमध्ये विविध अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ७ लाख १२ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुभाष बारसे, पो.नि. बाळासाहेब आघाव यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. यात पो.उपनि. प्रितम येवले, पो.उपनि. मनोहर शाहरे, पो.हवा. रामटेके, पो.हवा. ईडपाते, पो.शि. बळदे, पो.शि. गिरीपुंजे, पो.शि. बाबने, पो.शि. दमाहे, पो.शि. कांबळे, पो.शि. शेंडे, म.पो.शि. कडव यांच्यासह डी.बी. पथकाचा सहभाग होता.

अवैध रेती वाहतूक:- गस्तीदरम्यान चक्रधर कैलास परसमोडे, २० वर्षे, रा. बोरी ता. तुमसर यांच्याकडून विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३६ ए.आर. ५८४७ आणि ट्राली ज्यात अंदाजे १ ब्रास रेती होती. असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू:- पोउपनि. प्रितम येवले यांनी आशिष केशवराव डबले, ३५ वर्षे, रा. तामसवाडी भेटे यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी रिम झीम टीम टोबॅको ६ किलो किंमत ३३०० रु. आर गोल्ड जी २० फ्लेवर चेविंग टोबॅको २ किलो किंमत १३०० रु., इगल हुक्का शिशा टोबॅको ४० ग्रम किंमत ८५ रु. आणि सुप्रिम पान फराग पान मसाला ६० पुड्या किंमत ३०० रु. असा एकूण ४१८६ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

अवैध देशी दारू विक्री:- नेहरू वॉर्ड येथे गीता सुरेश गुर्वे, ६५ वर्षे हिच्याकडे अवैध रित्या विक्रीसाठी ठेवलेली १ लिटरच्या १० प्लास्टिक बिसलेरी बाटल्यांमधील देशी दारू किंमत २००० रुपये जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अवैध धंद्यांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *