जे. एम. पटेल महाविद्यालयातील जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमालास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये साधारणतः चारशेच्यावर नागरिकांनी सहभाग घेऊन योगासनांची सामूहिक प्रात्यक्षिके केली.
योग दिन उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य धाम केंद्राचे संचालक रामबिलास सारडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोब्रागडे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिटके, मेरा युवा भारत (नेहरू युवा केंद्राचे) सुशील भट, जे. एम. पटेल महाविद्यालयातील हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पत्रिकर, डॉ. भीमराव पवार, प्राध्यापक रोमी बिष्ट, योग शिक्षक विलास केजरकर, डॉ. जितेंद्र किरसान, प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे वृक्षरोपे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. रमेश खोब्रागडे, स्नेहल तिटके, भोजराज झांझाळ यांनी योग्य प्रात्यक्षिके करून दाखविले. योगमय वातावरणात ४०० हून अधिक नागरिक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच योग विद्येचा प्रसार व्हावा म्हणून ते भंडारा शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांना, सुरेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. एम. पटेल महाविद्यालयातील हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पत्रिकर व प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक भोजराज श्रीरामे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत वालदेव, प्रा. अनमोल सातपुते, डॉ. रोमी बिष्ट, डॉ. भावना रॉय, डॉ. अजय देवकाते, डॉ. प्रताप पटले, डॉ. अमर नंदनवार, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाने, आकाश गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते, प्रतीक लाडे, पराग गावंडे, प्रवीण देसाई, राजेंद्र सावरबांधे, सुधीर गळमळे, अतुल गजभिये, रामभाऊ योग शिक्षक मंजुषा डबले, अनिता खेडीकर, वैशाली गिरीपुंजे, कट्टे, रत्नाकर तिटके, एस. एम. खोब्रागडे, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र किरसान, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, जे. एम. पटेल महाविद्यालय, पतंजली योग समिती, पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा योग संघटना, संत गुलाब बाबा युवा प्रशिक्षण केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जे. एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग, एन.सी.सी. विभाग, एन.एस.एस. विभाग, व माजी विद्यार्थी संघटना, प्राध्यापक व योगसाधक-साधिकांनी सहकार्य केले.








