आरोग्य महोत्सवाच्या प्रथम दिनी ७०० रुग्णांनी घेतला लाभ

एक महिना चालणार महोत्सव,सर्व प्रकारचे रुग्णांची तपासणी

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- आजपासून सुरू झालेल्या आरोग्य महोत्सवाच्या प्रथम दिनी ७०० रुग्णांनी आरोग्य तपासणी आणि उपचाराचे लाभ घेतले. यात सर्व प्रकारचे रुग्ण सिरसी येथील भोजराज भोंडेकर वैद्यकीय महाविद्यालय तसेच पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे पोहोचले. ज्या मुळे या अभियानाला पुढेही असाच प्रतिसाद मिळणार असल्याची अपेक्षा डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी व्यक्त केली.

उल्लेखनीय आहे की, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भोंडेकर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. अश्विनी भोंडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत शुक्रवार पासून भव्य आरोग्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. सिरसी येथील भोजराज भोंडेकर वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन डॉ. अश्विनी भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आज पासून संपूर्ण एक महिना म्हणजेच १९ जुलै पर्यंत चालविण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या प्रथम दिनी जवळपास ७०० रुग्ण उपचारा करिता पोहोचले. ज्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार देण्यात आले. इतकेच नाही तर ज्या रुग्णांना भारती करून उपचार देणे गरजेचे होते त्यांना भारती करण्यात आले असून तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे.

आरोग्य महोत्सव २०२६ या नावाने आयोजित या शिविरात अस्थिरोग, स्त्रीरोग तज्ञ, मेडिसीन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ त्वचा रोग, बाल रोग, कान नाक घसा, मानसोपचार, दंत व मुख रोग, फिजियो थेरपी तज्ञ सह आयुर्वेदिक औषधोपचार द्वारे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार तर केल्या जाईलच, सोबतच आवश्यक असल्यास रुग्णांवर शस्त्रक्रिया सुद्धा निशुल्क करण्यात येईल. हा शिविर पुढील १ महिने चालत राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ अधिकाधिक संख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *