बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रात्यक्षिकेचे यशस्वी आयोजन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जे. एम. पटेल महाविद्यालय, पतंजली योग समिती व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन दि. २१ जून २०२६ ला सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.
त्यानिमित्ताने योगाचा प्रसार, जनजागृती तसेच नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने निमित्त गुरुवार दि. १८ ते २० जून २०२६ ला सकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रात्यक्षिके करण्यासाठी जे. एम. पटेल, आंबेडकर भवन जवळ येथे योग वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली योग समिती तथा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एम. पटेल महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. कार्तिक पन्नीकर, महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. भिमराव पवार, डॉ. रोमी बिस्ट, योग शिक्षक विलास केजरकर, भोजराज झंजाळ, मंजुषा डवले, अनिता खेडिकर, वैशाली गिन्हेपूंजे, कतरे, रत्नाकर तिडके, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र किसान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यात ग्रिवा चालन, स्कंद चालन, कटी चालन, घुटना चालन, ताडासन, वृक्षासन, पार हस्तन, अर्ध चक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, शशांक आसन, वक्रासन, मक्रासन, भुजंगासन, कपालभाती, नाडी शोधन, शितली, भामरी प्राणायाम, ध्यान अशाप्रकारे योगा प्राणायाम चे प्रात्यक्षिके करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व नागरिक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, योगाप्रेमींनी योग शिबीरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भोजराज श्रीराम यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. भिमराव पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भावना रॉय, डॉ. ममता राऊत, काजल कटनकार, अश्विनी साठवणे, संचिता आस्वाले, सानिया साठवणे, आर्या गौवर्धन, प्राची चटप, साधना भोयर, विवेक चटप, अधर्य गायधने, क्रिश, डिम्पल लिल्हारे, चैताली वलके, शितल कावळे, कोमल खोत, आर्या सार्वे, निलिमा आकरे, सुहानी फूलबांधे, पतंजली योग समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, जे. एम. पटेल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वृंद, खेळाडू, एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहकार्य केले.








