डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची महसूल सहाय्यक पदी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- सामाजिक न्याय भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, भंडारा येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गट-क परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यामध्ये अभिषेक प्रदिप मेश्राम रा. पिंपळगाव/सडक ता. लाखनी व राहूल प्रकाश बोकडे रा. कारधा ता.जि. भंडारा या दोन विद्यार्थ्यांची मंत्रालय मुंबई येथे महसूल सहाय्यक या पदावर निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा, विठ्ठलसिंग बलावणे, विशेष अधिकारी (शानिशा) तसेच कार्यालयाचे कर्मचारी यांचेमार्फत सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *