ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम (रकाना) देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक ९ जून रोजी दुपारी १:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ‘जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला जात नाही, तोपर्यंत जनगणनेवर बहिष्कार राहील,’ असा ठाम इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री तथा पक्षाचे विदर्भ प्रभारी अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार, विदर्भातील ओबीसी सेलच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा निषेध नोंदविण्यात आला आहे.
यावेळी प्रामुख्याने चरण वाघमारे, विजय नवखरे जिल्हाध्यक्ष ओबीसी भंडारा, शुभा झंझाड जिल्हाध्यक्ष भंडारा ओबीसी महिला, जिल्हा सचिव अजय मेश्राम, नितेश मारवाडे जिल्हाध्यक्ष युवक, शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, ज्ञानेश्वर पडोळे, रतन थाटकर, नारायण वैद्य, नितीन तलमले, राकेश श्यामकुवर, जिल्हाध्यक्ष महिला कामगार मीना पौणीकर, शाहिना खान, करुणा राऊत, मलोडे ताई, डोळस ताई, रवींद्र तिडके, बालचंद पाटील, कांतिलाल ढेंगे, माजी नगरसेवक इंद्रजीत येळणे, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार व्यक्त केला.









