साकोली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश बैस यांची फेरनियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- साकोली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेशसिंह बैस यांची अध्यक्षपदी पुन्हा फेर नियुक्ती करण्यात आली. साकोली तालुका पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी सभेमध्ये तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सिंह बैस यांची पुन्हा एकदा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष सुदाम हटवार, सचिव सुनील जगिया, सहसचिव शाहिद कुरेशी, कोषाध्यक्ष प्रशांत शिवनकर, सल्लागार सदस्य अशोक गुमा, प्रकाशराणा मेश्राम, राजू दुबे, मनिषा काशिवारे, संजय साठवणे, सदस्य म्हणून संतोष कोरे, चेतक हत्तीमारे, नाजिम पाशाभाई, किशोर गडकरी, डि. जी. रंगारी, ताराचंद कापगते, आशिष चेदगे यांची निवड करण्यात आली.

बैठकीत पत्रकार संघाची निवड होणे गरजेचे आहे असे प्रकाशराणा मेश्राम यांनी सांगितले. राजू दुबे, अशोक गुमा यांनी सहमती दर्शवली आणि राजेश सिंह बैस यांची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *