साकोली पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, साकोलीच्या पथकाने लाखनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील मोठ्या तलाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकलींसह एकूण ४ लाख ३३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन लाखनीच्या म.पो.हवा. चाचेरे यांनी पथकासह धाबेटेकडी येथील मोठ्या तलाव परिसरात छापा टाकला. त्यावेळी युवराज कुशन पंचबुद्धे (५३, रा. शिवनी/मोगरा), मनिष भारतजी शेंडे (३६, रा. शिवनी/मोगरा), सेवकराम शंकर सार्वे (४०, रा. मोगरा/शिवनी), मंगेश रमेश शिउरकर (३६, रा. धाबेटेकडी), शरद श्यामकरण नान्हे (२६, रा. धाबेटेकडी), देवेंद्र यादोराव दिघोरे (२५, रा. चिचटोला), मिलींद अजर्ुन खांडेकर (२३, रा. शिवनी/ मोगरा), नितेश ग्यानीराम नेवारे (३०, रा. धाबेटेकडी), गौरीशंकर नागो चाचेरे (४२, रा. धाबेटेकडी) आणि शशिकांत टोलीराम शेंडे (३४, रा. शिवनी/मोगरा) हे पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना रंगेहाथ सापडले.

आरोपींच्या अंगझडतीत व जुगाराच्या फळावरून रोख १५,२१० रुपये, ६ मोबाईल फोन, ५ मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ३३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.हवा. चाचेरे व पो.शि. कोटवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, साकोली यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *