लालपरी जनतेच्या विश्वासाचे प्रतीक : प्राचार्य राहुल डोंगरे

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तुमसर आगारात एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय स्थापत्य अभियंता भंडारा सतीश कटरे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक रचना मस्करे, वाहतूक नियंत्रक निशिकांत मोटघरे, सतीश नारनवरे, गजानन मोटघरे, पुरण पडारे, रामप्रसाद पटले, सोपान तीबुडे, पंचशीला उके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य राहुल डोंगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,ङ्गमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली लालपरी ही जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनली आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या एसटीने अनेक दशकांपासून प्रवाशांची अखंड सेवा केली आहे. कोणताही समारंभ, सामाजिक कार्यक्रम किंवा दैनंदिन प्रवास असो, नागरिक आजही लालपरीवर विश्वास ठेवून प्रवास करतात. चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या निष्ठावान सेवेमुळेच हा विश्वास टिकून आहे. भविष्यातही लालपरीची सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे,ङ्घ असे आवाहन त्यांनी केले. संचालन रचना मस्करे यांनीकेले, तर आभार प्रदर्शन गजानन मोटघरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल लांबट, रविता आडे, गौरी रेहपाडे, सोनाली फूणे, गायत्री कावळे, वीणा बिरनवारे, विपीन मोटघरे, आकाश बांगळकर, मनोज मोटघरे, कन्हैया रहांगडाले, मनोज राऊत, अोंकार गौतम, मनोज रोडके, योगेश वासनिक, पल्लवी जुनघरे, वसिम पठाण, सौरभ तिडके, अमोल गभने, चंद्रकांत बेलोकर आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *