शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मागील महिना दोन महिन्यापासून दर आठ दिवसांनी देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे, गॅस सिलेंडरचे दर वाढवून सामान्य जनतेचे जगणे कठीण केले त्यांनी निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज दिनांक ३ जून २०२६ रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. सध्याच्या घडीला कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्थिर असताना सुद्धा देशांतर्गत पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर चे दर प्रत्येक आठवड्याला वाढतांनी दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव हे आज जेवढे आहे तेवढेच म्हणजे ११०,११२ रुपये प्रति बॅरल भाव हा २०१४ सुद्धा होता. मग त्यावेळेस पेट्रोलचे भाव प्रति लिटर ७० रुपये होते सिलेंडरचे भाव ४२५ रुपये होते असे असताना आजही कच्च्या तेलाचे भाव जवळपास तेवढेच आहे परंतु जनतेला मात्र पेट्रोल प्रति लिटर ११ रुपये ते सुद्धा इथेनॉल मिक्स करून आणि सिलेंडर ९७५ रुपये ला उपलब्ध करून केंद्र आणि राज्य शासन एक प्रकारे जनतेची लूट करत आहेत.

या सरकारच्या मनात जर जनतेला दिलासा देण्याचा विचार असता तर या सरकारने पेट्रोलियम पदार्थावरील मूल्यवर्धित कर वॅट आणि इतर कर्जे लावलेले आहेत ते कमी करून जनतेला दिलासा देऊ शकले असते परंतु सरकारला जनतेची लूट करायची आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आजही गॅस सिलेंडर साठी उन्हाची परवा न करता जिल्ह्यातील जनता गॅस सिलेंडर साठी एजन्सी आणि गोडाऊनच्या बाहेर रांगा लावून उभे असतात, पेट्रोल पंपावर सुद्धा रांगा हे हमखास बघावयास मिळतात. केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थाचे जे भाव वाढवले ते केवळ पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित नसून रोजच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू चे सुद्धा त्यामुळे भाव वाढलेले आहेत. सामान्य माणसाचे या महागाईमुळे कंबरडे मोडलेले असताना देशाचे पंतप्रधान सामान्य जनतेला काटकसर करण्याचे आवाहन करतात परंतु स्वतः मात्र परदेश वाऱ्या करतात आणि परदेश बऱ्या करून त्या ठिकाणी चॉकलेट वाटपाची मजा घेतात. त्यामुळे या सरकारचे खरे रूप आता देशातील जनतेला कळले असून या सरकारला देशातील जनतेची कुठलीही चिंता नाही हे यावरून स्पष्ट होते त्यामुळे या सरकारने आता देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम थांबवून देशाच्या पंतप्रधानांनी “मन की बात’ नाही तर आता “जन की बात’ ऐकण्याचे आव्हान हे आंदोलनातून करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा संघटक लवकुश निर्वाण उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, तालुकाप्रमुख तिलक सर्वे, प्रमोद मेश्राम, मधु बुराडे, दिनेश नंदपुरे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, शहर समन्वयक ईश्वर टाले, उप तालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, राजू नान्हे, निलेश चामट चित्रांगंद सेलोकर, हर्षल टेंभुरकर, अनिरुद्ध गाढवे, सोमेश्वर सेलोकर, अतुल मिरासे, जितेंद्र हरकंडे, राज वधवानी, गोपीचंद गोमासे, भोजराज भेंडारकर, मिरज बडवाईक, सुनील सूर्यवंशी, सुनील बडवाईक, भगवान कोवेकर इत्यादी अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान गॅस पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द करा, रद्द करा, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी चा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *