साकोली पोलीसांची मोहाफुलाचे हातभट्यांवर छापेमारी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- पुणे येथील विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यु प्रकरणामुळे साकोली पोलीस अँक्सन मुळ मध्ये आले आहेत. साकोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात आज दि. ३० में २०२६ रोजी सकाळी ०५.३० वा. पासुन पोलीस स्टेशन साकोली हद्दित अवैध मोहाफुलाचे हातभट्टी लावणारे ईसमांवर कारवाई करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली येथील अधिकारी/अंमलदार व पोलीस स्टेशन साकोली येथील अधिकारी/अंमलदार यांची वेगवेगळी ०४ पथके तयार करूण संयुक्तरित्या वेगवेगळ्या ठिकाणी मोहाफुलाचे रनींग हातभट्यांवर छापे टाकुन कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई दरम्यान एकोडी जंगल परिसरात करण्यात आलेल्या छापा कारवाईत एकुण २१ हजार ५०० रूपये चा माल मिळुन आला.

सानगडी शेतशिवारात करण्यात आलेल्या छापा कारवाईत एकुण १ लाख ३५ हजार २२५ रूपये चा माल . मिळुन आला. गोंडउंमरी जंगल शिवारात करण्यात आलेल्या छापा कारवाईत एकुण १७ हजार ५२० रूपये चा माल मिळुन आला. जाभळी/सडक शेतशिवारात करण्यात आलेल्या छापा कारवाईत एकुण १ लाख ४९ हजार ९०६ रूपये चा माल मिळुन आला. असा एकुण ३ लाख २४ हजार १५१ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन, दारूबंदी सदराखाली ०४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत सदर चारही छापा कारवाईतील आरोपीतांची संख्या ०७ आहे. सदरची कारवाई नुरूल हसन पोलीस अधिक्षक भंडारा, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, यांचे मार्गदर्शनात शिवम विसापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात साकोलीचे ठाणेदार महादेव आचरेकर व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *